Saturday, December 10, 2016

सिंगापूर अभ्यास दौरा

सप्रेम नमस्कार,
प्राथमिक शिक्षक गण
विदेशात जाअून तेथील शिक्षणपद्धतीचा अभ्यास करतील 
ही भारताच्या स्वातंत्र्यानंतरची पहिलीच घटना होती. 
सिंगापूरचा थक्क करणारा विकास व अप्रतिम सौदर्य याची बीजं तेथील प्राथमिक शिक्षण पद्धतीत   असल्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. स्वच्छता,शिस्त, विकास,शिक्षण व प्रशासन याचा जागतिक मानदंड आज सिंगापूर ठरतंय..! 
पाश्चात्य देश येथील व्यवस्थापन व शिक्षण पद्धतीचं अनुकरण करताहेत. दारिद्र्यात खितपत पडलेल्या देशाच्या विस्मयकारक प्रगतीचा अजोड नमूना सिंगापूर. आपण सर्व शिक्षकांनी पहावा विद्यार्थ्यांना व परिवाराला दाखवावा असं हे धम्माल ठिकाण. विनंती एकच तेथे जाअून भारताची तुलना नको व भारताला दूषण देणं तर नकोच नको कारण त्यांचे प्रश्न व संदर्भ वेगळे आहेत
  राज्याचे दिशादर्शक नेतृत्त्व
 शिक्षण मंत्रीमहोदय
 श्री विनोद तावडे साहेब,
 प्रेरणादायी श्री नंदकूमार साहेब प्रधान सचिव शिक्षण,
 श्री जरग साहेब
 शिक्षण संचालक श्री रामचंद्र जाधव शिक्षण उपसंचालक व श्री शेणॅाय सर  व गाईड रॅविन यांच्या सर्वांच्या नियोजन व मेहनतीला सलाम..! 
सार्‍या वंचित हातात
ठेवू अक्षरांचे दिवे...!
अन् तृषार्त ओठात
प्रकाशाचे गीत नवे....!
सिंगापूर अभ्यास व पर्यटण  काही फोटो आपल्या राहुरी ब्लॉकवर टाकत आहे.कृपया आपण जरुर पहावे.
सुनिल विठ्ठल नरसाळे सर.
जि.प. प्रा. शाळा. गोपाळवाडी (चेडगाव) केंद्र -उंबरे