प्रति,
गटशिक्षणाधिकारी सर्व,
जि. प. अहील्यानगर
विषय: शिक्षण विभाग प्राथ.जि.प.अहिल्यानर च्या शैक्षणिक संकेतस्थळाबाबत सर्व शिक्षक ,विद्यार्थी,पालकांची जनजागृती करणेबाबत...!!
लवकरच शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्या लागणार आहेत. सद्य स्थितीत निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत सुटीच्या काळातही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी आपण विविध उपाययोजना करत आहोत. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना घरबसल्या शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे म्हणून आपण आपल्या शिक्षण विभागाचे अधिकृत संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी स्वाध्यायपुस्तिका ,ऑनलाईन टेस्ट,ऑफलाईन टेस्ट,मार्गदर्शिका उपलब्ध आहेत. परंतु बऱ्याच विद्यार्थी,पालक यांचे पर्यंत ही माहिती पोहोचलेली नाही. यास्तव पालक,विद्यार्थी जनजागृती साठी अगोदर सर्व शिक्षकांना या संकेतस्थळावरील सर्व बाबींची अद्ययावत माहिती असणे आवश्यक आहे.
यासाठी सोमवार दिनांक 28/04/2025 रोजी सकाळी 10 ते 11:15 या वेळेत प्रत्येक केंद्र स्तरावर शिक्षकांसाठी संकेतस्थळ परिचय कार्यशाळा घेण्यात यावी.यामधे तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने विभागाच्या संकेतस्थळावरील सर्व माहिती मोठ्या स्क्रीन वर समजावून सांगण्यात यावी. यासाठी तयार करण्यात आलेला 20 मिनिटांचा व्हिडिओ ही दाखविण्यात यावा. व घेतलेल्या कार्यशाळेचा अहवाल व्हिडिओ/ फोटो स्वरूपात सादर करण्यात यावा. सदर कार्यशाळेस कोणीही शिक्षक अनुपस्थित राहणार नाही याची काळजी घेण्यात यावी.
सदरील कार्यशाळेनंतर दुसऱ्या दिवशी प्रत्येक वर्गशिक्षकाने/ मुख्याध्यापकाने आपापल्या शाळेतील विद्यार्थी/पालक यांना माहिती साठी शाळेत LCD TV वा अन्य साधनांचा वापर करून या सारखीच कार्यशाळा घेवून माहिती द्यावी. सर्व विद्यार्थी ,पालक यांचेपर्यंत सर्व शैक्षणिक साहित्य वापर जनजागृती होईल या दृष्टीने प्रयत्न व्हावेत.